SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी आणि फायदे | SIP Information in Marathi 2024

एसआयपी (SIP) म्हणजे काय? | SIP Information in Marathi 2024

SIP Information in Marathi: मित्रांनो सध्या शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून लोक झटपट श्रीमंत होत आहेत. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांना चांगले रिटर्न्स देखील मिळत आहेत त्यामुळे आता सर्वसामान्य लोकही या मार्केटमध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. जे एकेकाळी शेअर मार्केटच्या नावानेच पळून जात होते ते आता या नवीन बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडाचा अवलंब करत आहेत. गुंतवणुकीचा हा एक अतिशय सोपा मार्ग आहे. म्युचल फंडातील गुंतवणूक दर महिन्याला एसआयपी( सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) पद्धतीचा वापर करून करता येतो. तुम्ही फक्त शंभर रुपयांनी एसआयपी सुरू करू शकता. हे अगदी बँक RD सारखे आहे परंतु यामध्ये तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज मिळतो.

तुम्ही तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याला ठराविक रक्कम वजा करून एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकता. गेल्या काही वर्षात एसआयपीच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक दिसून येत आहे. एसआयपी तुम्हाला म्युचल फंडामध्ये मासिक, साप्ताहिक किंवा अगदी दैनंदिन हप्त्याच्या स्वरूपात गुंतवणूक करण्याची सुविधा देते. एसआयपीच्या प्रत्येक मोड मध्ये तुम्ही वेगवेगळे फायदे आणि तोटे पाहू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिक परतावा मिळवण्यासाठी विचार करत असाल तर SIP Information in Marathi या लेखात तुम्हाला एसआयपी(SIP) म्हणजे काय, एसआयपी मध्ये गुंतवणूक कशी करावी आणि एसआयपी मध्ये मिळणारे फायदे आणि परतावा याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

SIP फूल फॉर्म | SIP Full Form in Marathi

एसआयपी ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची योजना आहे त्याचे पूर्ण नाव सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे आणि इंग्रजी भाषेत त्याला SIP(Systematic Investment Plan) म्हणतात.

SIP म्हणजे काय | What is Systematic Investment Plan in Marathi

एसआयपी ही एक गुंतवणूक योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही ठराविक वेळेच्या अंतराने म्युच्युअल फंडामध्ये निश्चित रक्कम गुंतवता. गुंतवणुकीचा हा वेळ मासिक, त्रैमासिक असू शकतो. एसआयपी तुम्ही केलेल्या एकूण गुंतवणूक खर्चाचे गणना करते आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक मर्यादेनुसार गुंतवणूक निवडण्याचे सुविधा देते.

एनएवी म्हणजे काय | What is Net Asset Value in Marathi

NAV ( Net Asset Value) म्हणजे निव्वळ मालमत्ता. म्युचल फंडात एसआयपी द्वारे गुंतवणूक केली जाते. त्यावेळी युनिट म्युच्युअल फंडाची किंमत मालमत्ता मूल्यानुसार निश्चित केली जाते.

एसआयपी मध्ये गुंतवणूक कशी करावी | How to do SIP Investment in Marathi 2024

How to do SIP Investment in Marathi
How to do SIP Investment in Marathi

आजकाल SIP मध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे, तुम्ही त्यात दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतात.पहिली गुंतवणूक डायरेक्ट प्लॅन द्वारे आणि दुसरी रेगुलर प्लान द्वारे करता येते. डायरेक्ट स्कीम मध्ये गुंतवणूकदार थेट गुंतवणूक करतो त्यात कोणी दलाल किंवा मधला माणूस नसतो. यामध्ये तुम्ही एएमसी च्या माध्यमातून कोणत्याही कंपनीला थेट गुंतवणूक करू शकता. यामुळे चांगला परतावाही मिळतो. नवीन गुंतवणूकदारांना यात अडचण येऊ शकते कारण यामध्ये मार्गदर्शक नसल्यामुळे नुकसान होण्याची शक्यताही लक्षणीय असते. माहितीच्या कमतरतेमुळे विश्लेषण करणे कठीण होते जे नुकसानीचे कारण देखील होऊ शकते.

नियमित योजनेत गुंतवणूकदार आणि बाजार यांच्यामध्ये दलाल किंवा मध्यम व्यक्ती गुंतलेली असते, आणि दलाल एएमसी कडून योजना विकत घेतो त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक केली जाते. या पद्धतीत गुंतवणूकदाराचे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. बहुतेक गुंतवणूकदार अशा प्रकारे गुंतवणूक करतात आणि ब्रोकर गुंतवणूकदारांकडून त्याची फी घेतात. नियमित योजनेत ब्रोकर गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात ज्यामुळे गुंतवणूकदारांना सोपे जाते.

Secured Credit Card Information in Marathi

एसआयपी चे फायदे | Benefits of SIP in Marathi 

  •  जर तुम्ही एसआयपी गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला त्यातून अनेक फायदे मिळतात यामध्ये जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरले तर तुम्हाला एसआयपी चा फायदा मिळेल कारण ते टॅक्स रिटर्न मध्ये सूट देते.
  • बचत करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे, कारण यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे भरण्याचा भार पडत नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वार्षिक गुंतवणूक देखील करू शकता आणि भरपूर पैसे जमा देखील करू शकता.
  • जोखीम टाळणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
  • तुम्हाला एसआयपीमध्ये चक्रवाढीचा फायदा देखील मिळेल जसे की तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला अधिक नफा मिळतो.
  • बाजारातील वाढता नफा पाहून तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता.
  • जर बाजार घसरत असेल तर तुम्ही एसआयपी थांबू शकता आणि जेव्हा बाजार सुधारेल तेव्हा तुम्ही पुन्हा एसआयपी सुरू करू शकता. तुम्हाला हि लवचिकता SIP मध्ये भेटून जाते.

एसआयपी चे तोटे | SIP Disadvantages in Marathi

  •  तुमची एसआयपी चुकली असेल तर तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.
  •  दर महिन्याला पैशाची व्यवस्था करावी लागते.
  •  इतर नुकसानही सोसावे लागू शकते.
  •  बाजारात चढ-उतार असताना चांगला परतावा मिळत नाही.
  •  जर तुमचा उत्पन्नाचा स्त्रोत नियमित नसेल तर एसआयपी भरू नका कारण त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

एसआयपी गुंतवणूक दस्तऐवज | SIP Invest Documents 

एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. म्युचल फंड क्रिप्टोकरेंसी, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.सर्व कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  •  पासपोर्ट आकाराचा फोटो
  •  बँक स्टेटमेंट
  •  चेक बुक
  •  आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  बँक खाते

या सर्व दस्तऐवजांसह तुम्ही एसआयपी मध्ये सहज गुंतवणूक करू शकता आणि तुम्ही ऑनलाईन वेबसाईट किंवा एप्लीकेशन द्वारे खाते तयार करून गुंतवणूक करू शकता. या दस्तऐवजांसह डिमॅट खाते(Demat Account) उघडले जाते, आणि निधी गुंतवणुकीसाठी केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. केवायसी शिवाय गुंतवणूक करू शकत नाही. केवायसी मध्ये तुम्हाला नाव, पत्ता, ईमेल आयडी, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि बँक डिटेल्स भराव्या लागतील.

एसआयपी गुंतवणूक मधील जोखीम काय आहे? | SIP Invest Risk in Marathi

जर आपण एसआयपी मधून जोखीमीबद्दल बोललो तर पैशाबाबतीत प्रत्येक गोष्टीत नक्कीच काही ना काही धोका असतो. त्याचप्रमाणे इथेही असाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लहान निधी सह एसआयपी मध्ये गुंतवणूक करून तुम्ही उच्च जोखमीच्या शक्यतेवर मात करू शकता. तोट्यात चालणाऱ्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करत असाल तर पैसे गमावण्याचा धोका जास्त असतो. अल्पमुदतीच्या गुंतवणुकीवर तोटा होऊ शकतो आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर तोटे होण्याची शक्यता खूपच कमी असते. याशिवाय चालू असलेली एसआयपी दोन-तीन महिन्यात खंडित केल्यास एसआयपी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे नुकसान होऊ शकते. कंपनीवर अचानक आलेल्या संकटामुळे ही तोटा होतो.

एसआयपी गुंतवणूक सर्वोत्तम फंड | Best SIP Funds in Marathi

क्र निधीचे नाव मासिक गुंतवणूक 3 वर्षाचा परतावा 5 वर्षाचा परतावा
1 ॲक्सिस ब्लूचीप फंड 5000 18.30% 11.30%
2 ॲक्सिस फोकस्ड 25 फंड 5000 16.64% 17.19%
3 डीएसपी इक्विटी फंड 5000 14.69% 14.36%
4 ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड 5000 41.39% 33.91%
5 एचडीएफसी बॅलन्स अडवांटेज फंड 5000 16.60% 15.50%
6 ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड 5000 8.48% 10.81%
7 कोटक स्टॅंडर्ड मल्टीकॅप फंड 5000 11.14% 13.24%
8 क्वॉन्ट इन्फ्रास्ट्रक्चर फंड 5000 38.02% 24.14%
9 निप्पोन इंडिया लार्ज कॅप फंड 5000 8.42% 10.90%
10 टाटा इंडिया कंजूमर फंड 5000 14.70% 15%
11 ICICI प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड 5000 16.68% 13.62%
12 आयडीएफसी सरकारी सुरक्षा निधी 5000 11.39% 8.93%
13 आयडीएफसी सरकारी सुरक्षा निधी 5000 11.32% 9.73%
14 निपॉन इंडिया इन्व्हेस्टमेंट टारगेट फंड 5000 11.21%
15 आयडीएफसी सरकारी सुरक्षा निधी 5000 11.18% 8.29%
16 आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कॉन्स्टंट मॅच्युरिटी गिल्ट फंड 5000 11.17% 8.84%
17 डीएसपी सरकारी सुरक्षा निधी 5000 11.08% 8.59%
18 Adele weiss सरकारी सेक्युरिटी फंड 5000 11.04% 8.60%
19

 

 

20

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कॉन्स्टंट मॅच्युरिटी गिल्ड फंड

 

टाटा डिजिटल इंडिया फंड

5000

 

 

5000

10.96%

 

 

41.48%

8.65%

 

 

35.52%

डायरेक्ट प्लॅन मधून गुंतवणूक कशी करावी | How to Invest in Direct Plan information in Marathi

डायरेक्ट प्लान द्वारे गुंतवणूक करण्यासाठी केवळ केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, तरच तुम्ही कोणत्याही एएमसी मध्ये गुंतवणूक करू शकता, आणि ब्रोकिंग चार्जेस पासून तुमची बचत होईल. तुम्ही ज्या फंड हाऊस मध्ये गुंतवणूक करू इच्छिता त्या फंड हाऊसच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता, आणि तुमच्या इच्छेनुसार योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्ही नवीन गुंतवणूकदार असल्यास नोंदणी करा किंवा नवीन गुंतवणूकदार या लिंक वर क्लिक करा, आणि वापरकर्ता आणि पासवर्ड तयार करा. तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक करणार आहात त्या कंपनीची चौकशी करा.

नियमित योजनेत गुंतवणूक कशी करावी | Regular Plan Invest information in Marathi

तुम्ही या योजनेत कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करू शकता. पॉलिसी बाजार वेबसाईटला भेट देऊन तुम्ही नियमित योजनेत गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. पॉलिसी बाजार कोणत्याही संस्थेद्वारे जारी केलेल्या उत्पन्नाचे समर्थन मूल्यमापन किंवा शिफारस करत नाही.

पेमेंट तारखेमधे चूक झाल्यास | Payment Date Default information in Marathi |

एसआयपी मध्ये पेमेंट साठी ऑटो डेबिट व्यवहाराची सुविधा आहे. यामुळे देय तारखेला बँक खात्यातून पैसे आपोआप कापले जातात. परंतु बँक खात्यात पैसे नसल्यामुळे एसआयपी निश्चित तारखेला कापली गेली नाही तर बँक तुमच्याकडून शुल्क घेते. म्हणूनच देय तारखेला तुमच्या खात्यामधे पैसे शिल्लक ठेवा.

FAQ

एसआयपी खाते कसे उघडायचे?
एसआयपी खाते कसे उघडायचे याविषयी माहिती आपल्याला वर सांगितली गेली आहे. तुम्ही SIP सुरु करण्यासाठी GROWW तसेचCoin by Zerodha हे अँप्लिकेशन वापरू शकता.

एसआयपीचे एसआयपी फायदे काय आहेत?
एसआयपी आपल्याला दरमहा आपल्या आवडत्या म्युच्युअल फंड योजनेत निश्चित रक्कम ठेवण्याची संधी देते. त्याचे फायदे वर नमूद केले आहेत.

म्युच्युअल फंड कोणता बरोबर आहे?
म्युच्युअल फंड आपल्या जोखमीवर अवलंबून असतात. आपल्या संशोधनानुसार जे तुम्हाला योग्य वाटेल त्या मध्ये तुम्ही गुंतववणूक सुरु करा. तसेच मी लेखात वर एसआयपी गुंतवणूक सर्वोत्तम फंड सुद्धा नमूद केले आहेत.

FINAL WORDS

तर मित्रांनो SIP information in Marathi हा लेख वाचून तुम्हाला एसआयपी (SIP) म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल हा SIP वर आमचा लेख तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर नक्कीच करा. जेणे करून त्यांना सुद्धा SIP बद्दल समजायला मदत होईल.

तसेच What is SIP in Marathi या लेखाबद्दल तुम्हाला काही शंका असतील किव्हा तुम्हाला SIP सुरु करताना काही अडचण येत असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आमच्या ब्लॉग वरील तज्ञ तुमच्या शंकाचे लवकरात लवकर निरसन करतील.

हे देखील वाचा

Education loan information in Marathi

What is NFT in Marathi

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment