Top 5 Zero Balance Bank Accounts In Marathi | कोणत्या बँकेमध्ये अकाउंट खोलावे?

Top 5 Zero Balance Bank Accounts In Marathi | कोणत्या बँकेमध्ये अकाउंट खोलावे? 5 सर्वात चांगले झिरो बॅलन्स बँक अकाउंट कोणते आहेत?

नमस्कार मित्रांनो,
Top 5 Zero Balance Bank Accounts In Marathi जर तुम्ही बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचा विचार करत असाल, परंतु तुम्हाला जर हे निश्चित करता येत नसेल की कोणत्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करावे, तर अगदी निश्चिंत रहा कारण तुमच्या या समस्याचे समाधान ह्या पोस्टमध्ये दिलेलं आहे. सामान्य व्यक्ती ज्यांचे उत्पन्न एक मर्यादित असतं, त्यांच्या मनात बँकेमध्ये अकाउंट ओपन करताना हा प्रश्न नक्की येतो, की नक्की कोणत्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करावे आणि कोणती बँक त्यांच्यासाठी चांगली असेल. Best Bank For zero balance account in marathi

बऱ्याच वेळा मर्यादित किंवा कमी उत्पन्न असल्याकारणाने लोकांना त्यांच्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन करायला प्रॉब्लेम येतो, अशातच जर तुमच्याकडे एक चांगली बँक अकाउंट असेल आणि ते 0 बॅलन्स सेविंग अकाउंट असेल तर मिनिमम बॅलन्स मेंटेन करायचा प्रॉब्लेम येणार नाही.

आणि म्हणूनच या गोष्टी पाहता आम्ही इथे पाच सर्वात चांगल्या बँक सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचे झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करुन मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवायच्या चिंतेतून नेहमीसाठी मुक्त होऊ शकता, आणि त्याचबरोबर चांगल्या व्याजदराचा देखील लाभ घेऊ शकता.

कोणत्या बँकेमध्ये अकाउंट खोलावे ? 

आजच्या काळामध्ये अशा खूप मोठ्या बँक आहेत ज्यामध्ये सेविंग अकाउंटला मेंटेन ठेवण्यासाठी बँकेमध्ये दहा हजार रुपये बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. अशामध्ये ज्या लोकांचे उत्पन्न कमी आहे, ते कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट खोलू शकत नाहीत आणि मिनिमम बॅलन्स अकाउंट मेंटेन करू शकत नाही.

तर अशा सगळ्या लोकांसाठी झिरो बॅलन्स अकाउंट उपयुक्त ठरते, कारण झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये बॅलन्स निल झाल्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा चार्ज घेतला जात नाही. याउलट अकाउंट होल्डरला त्या सर्व सुविधांचा लाभ देखील मिळतो ज्या एका रेग्युलर सेविंग अकाउंट होल्डर ला दिला जातो.

बँकिंगच्या अनुभवाला अधिक चांगलं करण्यासाठी, अधिकाधिक लोकांना बँकेसोबत जोडण्यासाठी बँकांद्वारे झिरो बॅलन्स अकाउंट खोलण्याची सुरुवात झाली, जी यशस्वी ठरली आणि आजच्या घडीला लाखो लोक झिरो बॅलन्स अकाउंट उघडतात.

तर या खाली आम्ही तुम्हाला पाच मोठ्या बँकांबद्दल माहिती दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकता आणि सेविंग बरोबरच बँकिंग सुविधांचा आनंद घेऊ शकता.

5 सर्वात चांगले बँक अकाउंट कोणते आहेत ? (5 Zero Balance Bank Account Opening In marathi)

5 बेस्ट बँक अकाउंट ची लिस्ट ज्यामध्ये तुम्ही तुमचे अकाउंट खोलू शकता.

1)  स्टेट बँक ऑफ इंडियाचे (BSBDA ) बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट. SBI Basic Saving Bank Deposit Account

SBI देशातील सर्वात मोठी जुनी आणि भरोसेमंद असलेली बँक आहे, यामध्ये झिरो बॅलन्स बँक अकाउंट ओपन केल्यानंतर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची फीज किंवा चार्ज आकारला जात नाही, आणि त्याचबरोबर यामध्ये पैसे डिपॉझिट करण्याची कोणतीही कमी किंवा अधिक लिमिट दिलेली नाही. यामध्ये बँकेद्वारे खातेधारकाला RuPay debit card /ATM card प्रदान केले जाते, आणि डेबिट कार्डवर वर्षाला चार्ज देखील द्यावा लागत नाही.

sbi zero balance account in marathi
sbi zero balance account in marathi

यामध्ये तेच व्याज मिळते जे एका रेग्युलर SBI अकाउंट होल्डरला दिले जाते. वर्तमान काळामध्ये 2.70% एवढे वार्षिक व्याज दिले जात आहे. या बँक अकाउंट मध्ये तुम्हाला महिन्याला चार कॅश विथ ड्रॉवल्स अगदी मोफत दिले जाते, म्हणजेच तुम्ही कोणत्याही एसबीआय किंवा दुसऱ्या एटीएम मधून पैसे काढू शकता. त्याचबरोबर खातेधारकाला यामध्ये नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा देखील लाभ घेता येतो.
Best Banks in India 2023

2) कोटक महिंद्रा चे 811 डिजिटल बँक अकाउंट. Kotak Mahindra 811 Digital Bank Account

हे कोटक महिंद्रा बँकेचे 811 लाईट सेविंग अकाउंट आहे, या अकाउंटला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये डिजिटल माध्यमाद्वारे तुम्ही खोलू शकता. हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे ज्यामध्ये तुम्हाला बॅलन्स मेंटेन करण्याची गरज नाही. यामध्ये खातेधारकाला कोणतेही फिजिकल कार्ड दिले जात नाही परंतु डिजिटल माध्यमातून पेमेंट केले जाऊ शकते. हे अकाउंट एका वर्षासाठी व्हॅलिड असते, ज्यास तुम्ही नंतर 811 एज सेविंग अकाउंट मध्ये बदलून घेऊ शकता. कोटक महिंद्रा बँक मध्ये तुम्हाला चार टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळू शकते.

कोटक महिंद्रा चे 811 डिजिटल बँक अकाउंट
कोटक महिंद्रा चे 811 डिजिटल बँक अकाउंट

3) आयडीएफसी (IDFC) फ्युचर फर्स्ट ( BSBDA ) अकाउंट. IDFC Future First BSBDA Account

आयडीएफसी BSBDA अकाउंट एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे, जे खातेधारकाला सर्व बँकिंग सुविधा प्रदान करते. या बँक अकाउंटला सिंगल तसेच जॉईंट दोन्ही प्रकारे ओपन केले जाऊ शकते, परंतु जर दुसऱ्या कोणत्याही बँक मध्ये तुमचे BSBDA अकाउंट ओपन झालेले असेल, तर अशा मध्ये तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकत नाही.

IDFC) फ्युचर फर्स्ट ( BSBDA ) अकाउंट
IDFC) फ्युचर फर्स्ट ( BSBDA ) अकाउंट

IDFC first bank account उघडल्यानंतर खातेधारकाला कोणत्याही प्रकारचे अकाउंट ओपनिंग चार्ज किंवा अन्युअल चार्ज द्यावा लागत नाही, याउलट खातेधारकाला फ्री RuPay डेबिट कार्ड, एटीएम ट्रांजेक्शन, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, इत्यादी सर्व सुविधा प्रदान केल्या जातात. IDFC saving account जवळपास पाच टक्के वार्षिक व्याज देते.

4) आर बी एल ( RBL ) बँक बेसिक सेविंग अकाउंट.

RBL बँकेचे बेसिक सेविंग अकाउंट एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे जे, उघडल्यानंतर तुम्हाला कोणताही अकाउंट ओपनिंग चार्ज लागत नाही आणि अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवण्याची गरज नसते. याउलट खातेदारकाला सर्व बँकिंग सुविधा जसे की अनलिमिटेड ATM ट्रांजेक्शन, Free RuPay डेबिट कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, NEFT, RTGS, इत्यादी सर्व सुविधा प्रदान केल्या जातात. यामध्ये जवळपास सात टक्के वार्षिक व्याज दिले जाते.

RBL ) बँक बेसिक सेविंग अकाउंट
RBL  बँक बेसिक सेविंग अकाउंट

5) इंडसइंड बँक झिरो बॅलन्स अकाउंट.

इंडस इझी अकाउंट एक झिरो बॅलन्स बेसिक सेविंग बँक अकाउंट आहे, ज्याला तुम्ही घरबसल्या KYC करून काही वेळातच खोलू शकता. बँक तुम्हाला तुमच्या आवडीचा अकाउंट नंबर निवडण्याची सुविधा प्रदान करते. त्याचबरोबर या अकाउंट मध्ये तुम्हाला मिनिमम अकाउंट मेंटेन करायची गरज नसते आणि कोणताही मेन्टेनन्स चार्ज द्यायची गरज नाही. हे अकाउंट तुम्हाला एटीएम कार्ड घ्यायचे की नाही हा पर्याय देखील पुरवते. त्याचबरोबर या अकाउंट मध्ये नेट बँकिंग, NEFT, RTGS यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. या सेविंग अकाउंट मध्ये जवळपास 4% वार्षिक व्याज मिळू शकते.

इंडसइंड बँक झिरो बॅलन्स अकाउंट.
इंडसइंड बँक झिरो बॅलन्स अकाउंट.

चॅट GPT म्हणजे काय?

निष्कर्ष :-

मित्रांनो आपण पाच सर्वात चांगल्या झिरो बॅलन्स बँक अकाउंट बद्दल जाणून घेतले आणि त्यांच्या फायद्यांबद्दल देखील माहिती घेतली. आम्ही आशा करतो की तुम्हाला आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल की कोणत्या बँकेमध्ये अकाउंट खोलावे? जरा हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर इतरांबरोबर शेअर करा.

धन्यवाद.

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment