Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh | Mi teacher zalo tar marathi nibandh

Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh | Mi Teacher zalo tar Marathi Nibandh

मित्रांनो जर का तुम्ही Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh या टॉपिक वर निबंधाच्या शोधात असाल तर तुम्हाला आजच्या या लेखात Mi teacher zalo tar marathi nibandh या टॉपिक वर सविस्तर निबंध भेटून जाईल. तुम्हाला हा निबंध आवडला तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh
Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh

जर मी शिक्षक झालो तर मी सर्वात अगोदर ते सर्व गुण अंगीकृत करेन जे की एका आदर्श शिक्षकांमध्ये असायला हवेत. कारण प्रत्येक विद्यार्थी हा त्याला आवडणारा शिक्षक किंवा त्याच्यासाठी आदर्श असणारे शिक्षक तो मनात आयुष्यभरासाठी ठेवत असतो, आणि त्या शिक्षकाप्रमाणेच स्वतः अनुकरण करत असतो. त्यामुळे माझे देखील स्वप्न आहे कि मी अनेक विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षक बनावे. विद्यार्थ्यांनी माझ्या अनेक चांगल्या गुणांचे अनुसरण करावे. त्यांनी देखील माझ्यातील सर्व चांगल्या गुणांचे अनुकरण करावे पण त्यासाठी मला अगोदर स्वतःमध्ये आणि माझ्या वागण्यात बदल करावे लागतील त्यासाठी मी पूर्ण मेहनत देखील घेईल.

अनेक विद्यार्थ्यांना शांत आणि प्रेमळ शिक्षक आवडतात त्यामुळे मी नेहमी वर्गात शांत राहून प्रत्येक विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे वागेन कुणावरही विनाकारण ओरडणार नाही. शिवाय गरजेच्या वेळी त्यांना शिक्षा देखील करेन. कारण विद्यार्थ्यांना वचक बसणे देखील गरजेचे असते. त्यांना जर वेळोवेळी शिक्षा दिली नाही केली तर ते वाईट कृत्य करण्यास घाबरणार नाहीत विद्यार्थी हे मळलेल्या पिठाच्या कणिकासारखे असतात त्यांना आपण जसा आकार देऊ तसे ते घडत जातात त्यामुळे त्यांना मी प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. पण काही विद्यार्थी हे खूप खोडकर असतात त्यांना प्रेमळ शब्दात सांगितलेले लक्षात येत नाही त्यावेळी मी त्यांना शिक्षा करून त्यांना वटणीवर आणण्याचा प्रयत्न करेन. शिवाय त्यांना पुन्हा ते वाईट कृत्य करण्यास भीती देखील वाटायला हवी अशी शिक्षा त्यांना देईन.

Maza Avadta Sant Essay in Marathi 

मी विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत शिकवेन. मी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेपुरते न शिकवता त्यांना जास्तीत जास्त ज्ञान कसे देता येईल यासाठी प्रयत्न करेन मी त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर ज्ञानही भरपूर दे कारण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबर अवांतर ज्ञानही असणे आवश्यक आहे माझ्याकडे असलेल्या ज्ञानाचा साठा मी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या विषयासंबंधी जास्तीत जास्त माहिती कशी देता येईल यासाठी वापरेन. प्रत्येक विद्यार्थ्याला खूप आत्मतेने आणि जीव तोडून शिकवेल आणि विद्यार्थ्यांमध्ये ढ आणि हुशार असा भेद  देखील करणार नाही.

कारण बुद्धीने प्राथमिक पाने कुणीच हुशार आणि ढ नसतो. जो विद्यार्थी अभ्यास करतो, त्यात खूप मेहनत घेतो तोच विद्यार्थी हुशार आणि उलट अभ्यास न करणारा ढ असतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यात हुशार आणि ढ कोणीच नसून अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हुशार होऊ शकतो तो वर्गात पहिला क्रमांक मिळवू शकतो ही भावना त्यांच्यात रुजवेन व प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देईल.

जर मी शिक्षक झालो तर सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळे पणाने वागेन. मी मुलांना शिस्तबद्ध पद्धतीने ठेवेन. मी त्यांना अगदी सुलभ भाषेत कोणताही पाठ शिकवण्याचा प्रयत्न करेन पाठ शिकवल्यानंतर जर विद्यार्थ्यांना काही समजले नाही तर लगेच त्यांना समजावून सांगेल, कारण शिक्षक हा असा व्यक्ती आहे की जो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतो जे विद्यार्थी माझ्या वर्गात अभ्यासामध्ये कमकुवत आहे त्यांच्याकडे मी भरपूर लक्ष देईल, ज्याप्रमाणे कुंभार हा मातीचा भांडी बनवताना तो त्याला पाहिजे तसा आकार देतो त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्याला पाहिजे तसे शिकवून त्यांना आकार देऊ शकतो. तसेच मी प्रथम माझ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची खरी आवड निर्माण करेल मी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देईन. जो शिक्षक शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये रस निर्माण करू शकत नाही त्याला शिक्षक कसे म्हटले जाऊ शकते? जेव्हा मन शिक्षणामध्ये गुंतलेले असते तेव्हा बऱ्याच वाईट गोष्टी आपोआपच नष्ट होतात आणि चांगले संस्कार मनात निर्माण होतात.

मी कधीही असा शिक्षक बनणार नाही जो शिक्षणाचे स्थान केवळ कमाईचे साधन मानतो. माझ्या पदाचा अभिमान बाळगून मी माझ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले शिकवेन मला जे पण विषय शिकवायचे आहेत ते मी अगदी मनापासून शिकवीन. मी शाळेत असे वातावरण तयार करीन ज्यामध्ये कोणताही विद्यार्थी न घाबरता मला शंका विचारू शकेल आणि शंकेचे निरसन करू शकेल. मी शिस्तीकडे विशेष लक्ष देईन अभ्यासात कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मी विशेष दृष्टी ठेवीन.

मी माझ्या सामर्थ्यानुसार सर्व विद्यार्थ्यंनाची दुर्बलता दूर करण्याचा प्रयत्न करेन. मी हुशार विद्यार्थ्यांसाठी आनंदाने परिश्रम घेईल विद्यार्थ्यांना थेट ज्ञान देण्यासाठी मी त्यांना ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणी फिरायला घेऊन जाईन. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी त्यांना नाटक, वादविवाद, चित्रे, निबंध, खेळ इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करेन.

Mi teacher zalo tar marathi nibandh
Mi teacher zalo tar marathi nibandh

जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शाळेतून मिळालेल्या अनुभवांच्या जोरावर आपले विद्यार्थी कितीही कठीण मार्ग अगदी सुलभ रीतीने पार करतील याची दक्षता घेईन. मी विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन सुधारण्याबरोबर, आचार आणि विचार क्षमता सुधारण्याचा देखील प्रयत्न करेन. शिवाय सुशिक्षित विद्यार्थी घडवण्यात बरोबरच कौशल्य पूर्ण विद्यार्थी व आदर्श माणूस घडवण्याचा प्रयत्न करेन. आयुष्यात नेमके काय करायचे आहे हा प्रश्न आपण नेहमी स्वतःला विचारतो पण आयुष्यात नेमके कुठे जायचे आहे हेच कळत नाही. तर मी आयुष्यात नेमके काय करायचे कुठे जायचे ही दिशा त्यांना दाखवण्याचा काम करेन. मी हे सर्व कामे फक्त एक शिक्षक म्हणून नाही तर मला माझ्या पुस्तकांनी माझ्या शिक्षकांनी माझ्या अनुभवांनी जे काही शिकवले आहे ते मी मुलांना शिकवेन. मी माझ्या विद्यार्थ्यांचे ध्येय भरकटू देणार नाही तर ते त्यांच्या ध्येयापर्यंत कसे जातील किंवा पोचतील याचा सदैव प्रयत्न करेन.

राहणीमान आणि उच्च विचारसरणी हा माझा हेतू असेल माझे राहणीमान व पोशाखांच्या साधेपणामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये साधेपणाची आणि नम्रतेची भावना जागृत करेल माझ्या सहकारी शिक्षकांबद्दल माझे वर्तन आदर व आपुलकीने भरलेले असेल. मी नेहमी लक्षात ठेवीन की मला अशा नागरिकांची निर्मिती करायची आहे ज्यांच्या खाद्यांवर देशाच्या प्रगतीचा भार पडणार आहे.

Final words

तर मित्रांनो मला अशा आहे Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh आवडला असेल. तुमच्या काही शंका असतील किव्हा तुमच्या कडे सुद्धा जर मी शिक्षक झालो तर किव्हा Me Shikshaka Zali Tar Marathi Nibandh या टॉपिक वर छान माहिती असेल तर कंमेंट मध्ये नक्की शेअर करा. आम्ही आमच्या या ब्लॉग च्या माध्यमातून तुम्ही शेअर केलेली माहिती इतर लोकांपर्यंत पोचवू.

हे देखील वाचा: 

Mobile Shap ki Vardan Marathi

Why Teachers Are Important in Society

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh | Mi teacher zalo tar marathi nibandh”

Leave a Comment