Shakuntala Devi Biography in Marathi । शकुंतला देवी जीवनचरित्र

Shakuntala Devi Biography in Marathi । शकुंतला देवी जीवनचरित्र । The Indian  Human Computer Shakuntala Devi In Marathi

 

Shakuntala Devi Biography in Marathi मानवी कम्प्युटर या नावाने विख्यात गणिततज्ञ त्याचबरोबर ज्योतिषी शकुंतला देवी यांना अप्रतिम वेग आणि संख्यात्मक आकडेमोड सहज सोडवण्याच्या क्षमतेमुळे त्यांना ‘मानवी संगणक’ असे संबोधले गेले. यांनी यांच्या काळातील सर्वात फास्ट समजला जाणाऱ्या संगणकांना आकडेमोड मध्ये मात दिली. शकुंतला देवी ह्या भारतातील एक महान व्यक्तिमत्व त्याचबरोबर चैतन्यशील महिला होत्या.

शकुंतला देवी जीवन माहिती 

जन्म : 4 नोव्हेंबर , 1929 बंगळूर , कर्नाटक

मृत्यु : 21 एप्रिल , 2013 बंगळूर , कर्नाटक

कार्यक्षेत्र : विश्वस्तरावर मानवी कम्प्युटर म्हणून विख्यात असलेल्या एक सुप्रसिद्ध गणित तज्ञ.

शकुंतला देवी । Mathematician Shakuntala Devi Information In Marathi

  • 1980 ते 90 च्या दशकामध्ये भारताच्या कोणत्याही गाव किंवा शहरांमध्ये एखादा व्यक्ती जर गणितामध्ये हुशार होत असेल तर त्याबद्दल असं म्हटलं जायचं की तो विद्यार्थी शकुंतला देवी बनत आहे.
  • लहानपणापासूनच अद्भुत प्रतिभा लाभलेल्या त्याचबरोबर गणिततज्ञ होत्या. त्या सर्व प्रकारच्या गणितीय प्रश्नांची उत्तरे देण्यात सक्षम होत्या. आपल्या गणितीय शक्तीमुळे त्यांनी लोकांमध्ये या विषयावरती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एक कुशल गणित तज्ञ सोबतच त्या ज्योतिष शास्त्राच्या जाणकार, सामाजिक कार्यकर्ता आणि लेखक देखील होत्या. त्यांच्या कार्याने लाखो लोकांना जागृत केले. यांच्याद्वारे करण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण कामांना त्यांची पुस्तके फिगरिंग : द जॉय ऑफ नंबर्स, एस्ट्रोलॉजी फॉर यू, परफेक्ट मर्डर , आणि द वर्ल्ड ऑफ होमोसिक्युल्स यामध्ये बघता येईल.

प्रारंभिक जीवन । Early Life Of Shakuntala Devi In Marathi

  • गणिती आकडेमोड डोळ्याची पापणी लवते क्षणी करण्यामध्ये माहीत असलेल्या शकुंतला देवी यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 ला बंगळूर मधल्या एका रुढी वादी कन्नड ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. शकुंतला देवी यांचा परिवार हा बऱ्यापैकी गरीब होता त्यामुळे त्या औपचारिक शिक्षण देखील घेऊ शकल्या नाहीत.
  • त्यांचे वडील तरुण असताना त्यांनी मंदिराचे पुजारी बनण्यासाठी विरोध केला त्याचबरोबर ते मदारी लोकांसारखे रशीवर चालण्याचे खेळ दाखवून लोकांचे मनोरंजन करायचे. शेवटी ते काही सर्कस मध्ये कलाकाराच्या रूपात काम करायला लागले. शकुंतला देवी जेव्हा फक्त तीन वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वडिलांना पत्त्यांमध्ये कितीतरी वेळा हरवले होते. त्यांच्या वडिलांना जेव्हा स्वतःच्या मुलीच्या या क्षमतेबद्दल समजले त्यावेळेस त्यांनी सर्कस मध्ये काम करणे सोडून देऊन, शकुंतला देवी यांना घेऊन सार्वजनिक कार्यक्रम करणे चालू केले. यांच्या क्षमतेला त्यांनी स्थानीय स्तरावर प्रदर्शित केले.
  • आपल्या वडिलांसोबत रोड शो करणाऱ्या शकुंतला देवीला अजून देखील म्हणावी अशी ओळख मिळाली नव्हती. पण जेव्हा त्या पंधरा वर्षांच्या होत्या त्यावेळेस त्यांना राष्ट्रीय मीडियासोबतच आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये ओळख मिळण्यास सुरुवात झाली. शकुंतला देवी या पहिल्यांदा सगळ्या लोकांसमोर आल्या, ते म्हणजे ज्या वेळेस बीसीसी रेडीओ च्या एका कार्यक्रमांमध्ये त्यांना अंक गणिताचा एक खूपच कठीण प्रश्न विचारला गेला ज्याचे उत्तर काही क्षणात शकुंतलादेवी यांनी दिले. आणि मजेशीर गोष्ट अशी की शकुंतला देवींनी दिलेले उत्तर हे योग्य होते तर रेडिओ प्रस्तुतकर्त्यांचे उत्तर चुकीचे होते.

व्यक्तिगत जीवन । Personal Life Of Shakuntala Devi In Marathi 

  • शकुंतला देवी यांचा विवाह 1960 मध्ये कोलकत्याच्या एका बंगाली आयएएस अधिकारी परितोष बॅनर्जी यांच्यासोबत झाला. परंतु काही कारणास्तव त्यांचे वैवाहिक संबंध जास्त दिवस टिकू शकले नाहीत आणि 1979 मध्ये त्यांनी त्यांच्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला. पुढे 1980 साली त्या आपल्या मुली सोबत बेंगलोरला परतल्या. येथे त्यांनी सेलिब्रेटी आणि राजकारण्यांना ज्योतिषी सल्ले द्यायला सुरुवात केली. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्या खूपच अशक्त झाल्या होत्या, शेवटी 2013 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

मानवी संगणक म्हणून त्यांची ओळख आणि प्रसिद्धी । Famous Human Computer Shakuntala Devi Mahiti 

  • शकुंतला देवी यांनी 50 हून अधिक देशांची यात्रा केली, आणि बरेच शैक्षणिक संस्था, थिएटर्स त्याचबरोबर टेलिव्हिजनवर देखील आपल्या गणितीय क्षमतेचे प्रदर्शन केले. 27 सप्टेंबर 1973 रोजी पूर्ण विश्वामध्ये प्रदर्शित होणाऱ्या रेडिओ चॅनल बीबीसी द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एक प्रोग्राम “ नेशनवाईड ” मध्ये त्यावेळेसचे बहुचर्चित बॉब वेलिंग्स द्वारे विचारण्यात आलेल्या सर्व कठीण गणित प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर, न चुकता शकुंतला देवी यांनी दिली त्यामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले. त्यांच्या या प्रतिभेमुळे त्यांचे भारतासोबतच संपूर्ण वैश्विक स्तरावर त्यांचे चाहते हे वाढतच राहिले.
  • एवढ्या कमी वयामध्येच गणित या क्षेत्रामध्ये असलेली अद्भुत क्षमता त्यावेळेस संपूर्ण जगामध्ये कुठेही बघायला मिळत नव्हती. विश्वामध्ये आपले गणितीय कौशल्याची ओळख करून दिल्यानंतर त्या आपल्या भारतामध्ये संपूर्ण प्रकारे प्रसिद्ध झाल्या. यानंतर इम्पेरियल कॉलेज, लंडनमध्ये त्यांनी 18 जून 1980 ला गणिता संबंधित एका कठीण प्रश्नाचे उत्तर काही सेकंदामध्ये देऊन उपस्थित लोकांना आश्चर्यचकित केले.
  • वय वर्षे फक्त 16 असताना त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी तेव्हा मिळाली जेव्हा त्यांनी, दोन 13 आकडी संख्यांचा गुणाकार 28 सेकंदांमध्ये काढून, त्यावेळेसच्या सगळ्यात fast समजल्या जाणाऱ्या संगणकाला 10 सेकंदाच्या फरकाने हरवले.
  • त्यांची त्यावेळेस असलेली ही अद्भुत क्षमता बघून सर्वांना त्यांचे परीक्षण घ्यायचे होते. 1977 साली शकुंतलादेवी यांना अमेरिकेला जायची संधी मिळाली. येथील डलासच्या एका युनिव्हर्सिटी मध्ये यांची स्पर्धा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या एक कम्प्युटर युनिव्हॅक सोबत झाली. या स्पर्धेत शकुंतलाला मानसिक गणनेद्वारे 201 अंकांचे 23 वे मूळ शोधायचे होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना 50 सेकंद लागले, तर ‘युनिव्हॅक’ नावाच्या संगणकाला या कामासाठी 62 सेकंद लागले. या घटनेनंतर लगेचच शकुंतला देवी यांचे नाव ‘इंडियन ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणून जगभर प्रसिद्ध झाले.

 

पुरस्कार आणि सन्मान । Awards Of Shakuntala Devi In Marathi 

  • शकुंतला देवी यांना फिलिपिन्स विश्वविद्यालयाने 1969 ला “ वर्षाची विशेष महिला “ ही उपाधी दिली आणि गोल्ड मेडल प्रदान केले.
  • 1988 ला वॉशिंग्टन डीसी मध्ये यांना रामानुजन मॅथेमॅटिकल जीनियस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
  • त्यांची ही प्रतिभा बघून त्यांचे नाव 1982 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आले.
  • त्यांच्या मृत्यूच्या एक महिना आधी 2013 साली त्यांना मुंबईमध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
  • यांच्या 84 व्या जन्म दिवसादिवशी चार नोव्हेंबर 2013 ला google ने यांच्या सन्मानार्थ एक गूगल डूडल समर्पित केले.

निधन । Death Of Shakuntala Devi In Marathi 

शकुंतला देवी यांचे 21 एप्रिल 2013 रोजी बंगळुरू (कर्नाटक) येथे वयाच्या 83 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आणि दीर्घ आजारानंतर मूत्रपिंडाच्या समस्येमुळे निधन झाले.

धन्यवाद.

Also read: MBA Franchise Information in Marathi

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment