धीट कुत्रा | Marathi Katha | Marathi Story

एकदा एका कुत्र्याच्या मागे गावातली पाचपंचवीस कुत्री लागली. पळून पळून तो कुत्रा अगदी दमून गेला. तेव्हा त्याने विचार केला, ‘आता काही आपण यांच्या तावडीतून सुटत नाही. तेव्हा काय होईल ते होईल आपणच यांच्यावर चालून जावे.’

असे म्हणून तो मागे वळला आणि मोठमोठ्याने गुरगुरत त्यांच्यावर तुटून पडला. त्याचा तो आवेश बघून त्या कुत्र्यांची गाळण उडाली. ती कुत्री भिऊन पळून गेली.

तात्पर्य

– संकटाचे वेळी धीटपणाच कामी येतो.

Leave a Comment