आल्या नाचत नाचत | Aalya Aalya Nachat Marathi Lyrics

आल्या नाचत नाचत | Aalya Aalya Nachat Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – बालकराम
चित्रपट – केला इशारा जाता जाता

आल्या नाचत नाचत मेनका रंभा
आज अवतरली जशी इंद्रसभा
कानांत पांचुची कर्णफुले
कंठात हिर्‍यांची माळ रूळे
नवरत्‍न कटि वर चमचमले
जशी रवि-चंद्राची तेज:प्रभा
स्वर किन्‍नर गाती सप्‍त सुरा
दश दिशा उजळती रंग जरा
देहभान हरपले चराचरा
रसपान करीत नटराज उभा

Leave a Comment