अशी बायको हवी | Ashi Bayko Havi Marathi Lyrics

अशी बायको हवी | Ashi Bayko Havi Marathi Lyrics

गीत – प्र. के. अत्रे
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – पं. उदयराज गोडबोले
नाटक – अशी बायको हवी !


अशी, अशी बायको हवी
मला हो, अशी बायको हवी !

पोर असावी अल्लड भोळी
भाव निरागस लाजरी कळी
रुसवा-फुगवा तिचा असावा लाडिक अन्‌ लाघवी
अशी, अशी बायको हवी !

नार असावी नेक पतिव्रता
तिज लाजाव्या द्रौपदी, सीता
पतिपरायण सती असावी नेत्र न जी चाळवी
अशी, अशी बायको हवी !

Leave a Comment

x