आठवणींनो उघडा डोळे | Athvaninno ughada Dole Marathi Lyrics

आठवणींनो उघडा डोळे | Athvaninno ughada Dole Marathi Lyrics

गीत – पी. सावळाराम
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – आशा भोसले
चित्रपट – सून लाडकी या घरची


घरास माझ्या परतुनि आले
आठवणींनो, उघडा डोळे

गौरीहर तो इथे पूजिला
वाजतगाजत सासरी गेले
मिठी मारता, कर थरथरता,
आसवांचे अमृत प्याले

मोठ्याची मी सून होता
नाही बघवले ह्या दैवाला
आठवणींनो, नयनीं बघु द्या-
कशी वागले, कशी मी चुकले ?

Leave a Comment