बकासुराचा मृत्यू | Marathi Katha | Marathi Story

पांडव काही दिवसांनी एकचक्रा नावाच्या नगरीत पोहोचले. ते सर्वजण तेथे त्यांचे नाव व गाव बदलून ब्राम्हण-वेषाने फिरू लागले.

एके दिवशी ते एका ब्राम्हणाच्या घरी आले. तेथे त्यांचे तीन दिवस चांगले गेले. पण चौथ्या दिवशी त्यांना अचानक कोणाची तरी रडारड ऐकू आली. तेव्हा कुंती काय झाले हे बघण्यासाठी घरमालकांकडे गेली. घरमालकिणीने तिला सर्व हकिगत सांगितली. गावाच्या बाहेर एक बकासुर नावाचा राक्षस रहात होता. तो रोज गावात येऊन प्रत्येकाला मारझोड करून काही माणसांना ठार मारायचा. त्यांच्याकडील सर्व अन्न घेऊन जायचा. म्हणून एक दिवस गावातल्या सगळया लोकांनी ठरविले की, त्या राक्षसाला रोज गाडाभर अन्न, दोन बैल व एक माणूस एवढे द्यायचे. म्हणजेच रोज एका घरातून माणूस जायचे असे ठरले. ती मालकीणबाई कुंतीला म्हणाली, “आज आमच्या घराची पाळी आहे, मी आता काय करू.” असे म्हणत ती मालकीणबाई खूप जोरात रडू लागली.

कुंतीने तिची समजूत घातली. भीमाला तिने राक्षसाकडे पाठविले. भीम बकासुराच्या गुंफेसमोर जाऊन उभा राहिला. आणि त्याने त्याला, “ए बक्या, बाहेर ये,” असे मोठयाने हाक मारले. भीमाने बैल पळवून लावले. त्याच्यासाठी आणलेले अन्न तो स्वतःच खाऊ लागला.

बकासुर राक्षस रागाने भीमाच्या अंगावर तुटून पडला. त्या दोघांची खूप वेळ मारामारी चालली होती.

अखेरीस भीमाने बकासुराला ठार मारले. आणि तो नदीवर स्नान करून परत घरी आला. कुंतीने कौतुकाने त्याच्या पाठीवर हात फिरवला व आशीर्वाद दिला, “भीम, तुझ्या शक्तिचा उपयोग दृष्टांना मारण्यासाठी होवो.

Leave a Comment