भीती – जगातील सर्वात मोठे मोटिव्हेशन | Best Marathi Motivation on Life

भीती – जगातील सर्वात मोठे मोटिव्हेशन | Best Marathi Motivation on Life

Best Marathi Motivation on Life: जर तुम्ही मला लक्षपूर्वक हा लेख वाचत असाल, फक्त वाचण्यासाठी नाही तर पूर्ण हृदयापासून माझ्या शब्दांना तुम्ही अनुभवता आहात… तर मी तुम्हाला चॅलेंज करतो की हा लेख तुमच्या अंतर्मनाला भेदणारा असेल.

मला लाज वाटायला हवी, स्वतःवर, माझ्या आळशी पणा वर, माझ्या सर्व नकारात्मक विचारांवर, माझ्या इगो वर, माझ्या दुसऱ्यांना बघून जळण्याच्या वृत्तीवर! का तोंड सोडून बसलो आहे? काही करत का नाहीये? का पराभूत असल्यासारखे अनुभवतो आहे? का माझी संपूर्ण एनर्जी ही रडण्यात आणि क्रोध करण्यात वाया घालवतो आहे?

मला लाज वाटायला हवी, माझ्या या उशिरा उठण्याच्या सवयीवर, माझ्या जास्त झोपण्यावर, माझ्या जास्त खाण्यावर, माझ्या प्रत्येक नशा करण्याच्या सवयीवर, माझ्या सर्व वाईट सवयींवर, माझ्या या प्रेमाच्या जाळ्यात फसण्यावर ,माझ्या पैशांच्या वायफट खर्चावर, आणि जर पैशांची कमी आहे तर मला लाज वाटायला हवी की भारतात इतक्या साऱ्या संधी उपलब्ध असून देखील मला पैशांची कमतरता जाणवते आहे.

मला स्वतःवर राग यायला हवा कारण मी फक्त लोकांना दाखवून देण्यात लागलो आहे. कारण मी प्रत्येक वेळी शो ऑफ करू इच्छितो. कारण मी प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी हा विचार करतो की लोक काय म्हणतील? मला लाज वाटायला हवी स्वतःवर! आज 20 वर्षांचा झालो आहे आणि अजूनही आपल्या पैशांनी आपल्या आई वडिलांना कुठे फिरायला घेऊन गेलेलो नाही. मार्क झुकेरबर्ग यांनी 19 वर्ष वयाचे असताना फेसबुक बनवले होते आणि ते आज संपूर्ण जगाचे सर्वात तरुण कोट्याधीश आहेत.

मला लाज वाटायला पाहिजे, मी माझ्या कॉलेज मध्ये सर्व वेळ वाया घातला, आणि आजही मी काहीच करत नाहीये. फक्त रात्री उशिरापर्यंत फेसबुक वर युट्युबवर जे उपयोगी नाही ते कंटेंट स्वाईप उप करत जात आहे. योग्य आहेत ते लोक जे मला बघून हसत आहेत, खूप योग्य आहेत ते लोक जे माझी चेष्टा करतात, कारण मी याच बेइज्जतीच्या लायक आहे. केले काय आहे मी? का इगो आहे माझ्यामध्ये? एक अभ्यास नीट होऊ शकत नाहीये, एक जॉब धडाचा होऊ शकत नाहीये, एक व्यवसाय योग्य प्रकारे हँडल होत नाहीये, एक काम ठिक होत नाहीये, कोणत्या गोष्टीचा माज आहे मला? का मी माझ्या आई वडिलांशी भांडून खोलीत बसून एकटा एकटा रडतोय?

जेव्हा एखाद्याची वाईट वेळ सुरू असते तेव्हा तिथे मी ज्ञान देत बसतो. परंतु जेव्हा स्वतःच्या आयुष्यात काही होते आहे तेव्हा का माझ्या मूड ची वाट लागून जाते? का माझा मेंदू काम करणे बंद करतो? का मी घाबरतो? रात्रभर जागून काढून तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचार करून काय मोठं करू इच्छित आहे मी? ज्या गोष्टींना काहीच महत्व नाहीये!

पण आता बस … आता आणखी भीती नाही… आता आणखी आळस नको, आता आणखी क्रोध नाही, आणखी त्रस्त व्हायला नको… खूप झाले आता… मानलं की काहो दिवसांसाठी मी थोडासा त्रस्त होऊन डिस्टर्ब झालेलो होतो. जितके दिवस मी त्या वायफट विचारांत वाया घातले त्याची सर्व कसर, प्रत्येक दिवसाची कसर येणाऱ्या प्रत्येक दिवसात निघणार आहे. आय एम बॅक! काहीही होऊद्यात, असे नाही मरायचे, इथेच नाही मरायचे, या परिस्थितीत नाही मरायचे ….

बिल गेट्स म्हणले होते ना की गरीब म्हणून जन्म घेणे हा तुमचा दोष नाहीये, गरीब म्हणून मरने हा आपला दोष आहे. काहीही होऊ देत परंतु अशा परिस्थितीत मी तरी खुश नाहीये, मी येतो आहे आपल्या जीवनाला पुन्हा एक नवी दिशा देण्यासाठी येतो आहे…

मित्रांनो Best Marathi Motivation on Life चा आमचा हा लेख वाचून तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली असेल तर आमचा हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment