भावभोळ्या भक्तिची | Bhaavbholya Bhaktichi Marathi Lyrics

भावभोळ्या भक्तिची | Bhaavbholya Bhaktichi Marathi Lyrics

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – लता मंगेशकर


भावभोळ्या भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी

भाबडी दासी जनी गाताच गाणी
दाटुनी आले तुझ्या डोळ्यांत पाणी
भक्तिचा वेडा असा तू चक्रधारी

शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
वैभवाचा साज नाही, मी भिकारी

अंतरीची हाक वेडी घालते रे
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी माझी व्यथा ही तूच सारी

Leave a Comment