बियावाचुनि झाड वाढते | Biyavachuni Zaad Vadhate Marathi Lyrics

बियावाचुनि झाड वाढते | Biyavachuni Zaad Vadhate Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले ,  पुष्पा पागधरे
चित्रपट –  लाखात अशी देखणी


Biyavachuni Zaad Vadhate Marathi Lyrics

ऐक फेकते सवाल पहिला जवाब याचा देई ग
बियावाचुनि झाड वाढते आभाळावर जाई ग

बियावाचुनि झाड वाढते ही तर हरीची माया ग
निळ्या ढगांचे झाड देतसे उभ्या जगाला छाया ग

चंद्रावरती डाग कशाचा काळाकाळा राही ग
छाप सशाचा की हरिणीचा सांग शोधुनी बाई ग

दिवसभर रंगबाजीने अशी थकावट येते ग
चंद्रसख्याच्या छातीवरती रात विसावा घेते ग

पानविड्याचा पिंक लोचनी काजळ लागे ओठी ग
भाळावरती मेंदी ल्याला कसा सांग जगजेठी ग

श्रीकृष्णाचे नयन मनोहर राधा चुंबी रात्री ग
तिच्या मुखीचा पिंक राहिला श्रीकृष्णाच्या नेत्री ग
राधेचेही चुंबी डोळे परत फेडीने जगजेठी
तिच्या नेत्रीचे काजळ उरले श्रीकृष्णाच्या ओठी
आली होती मेंदी लावून राधा पाया-नखा
आर्जविता तिज पाया पडला नटवर कृष्णसखा
त्या मेंदीची टिकली राही तशीच त्याच्या भाळी ग
तीच भूषणे लेवून परते श्याम उजळत्या वेळी ग
तीरकमठ्यासह दोन पारधी गोरा पर्वत चढले ग
तीळास फटुनी नखाएवढ्या तळ्यात दोघे पडले ग
बुडले ते ना वरी निघाले रमले त्या ठायी
अशी कशी ही सांग बाई झाली नवलाई

दोन चोरटे पुरुषी डोळे न्याहाळती नवनार
पायापासुनि तिला न्याहाळीत वरी पोचले पार

हनुवटीवरती तीळ तियेच्या गालावरती खळी
तिथेच खिळुनी बसले वेडे भान न त्यांना मुळी

Leave a Comment

x