चेहऱ्यावरील डाग घालविण्यासाठी घ्यायची काळजी । Treatment For Black Spots In Marathi

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घ्यायची काळजी | Remove Face Blackheads In Marathi

१. सौंदर्य वृद्धी होण्यासाठी दररोज ओल्या हळदीचा रस घ्यावा .

२. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी केशर दुधात उगाळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावे .

३. दुधात जायफळ उगाळून लावण्यास चेहऱ्यावरील डाग जातात व फोड येणे कमी होते .

४. दररोज अंजीर खाल्यास चेहऱ्यावर डाग येणे कमी होते .

५. चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कच्च्या बटाट्याचा रस त्या डागावर लावल्यास डाग कमी होतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलते .

६.पिंपलचा त्रास होत असेल तर लवंगाच्या तेलाचा आपण वापर करू शकतो

७.उकळत्या पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेतल्याने काळे डाग जाण्यास मदत होते .

८.पिंपल्स व डोळ्याखालील काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे .

९.पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो.

१०.पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसून त्यात जायफळ पेस्ट मिसळून जाडसर भार चेहऱ्यावर देणे.

११.चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा, १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.

१२. टोमॅटोचा रस १ चमचा , काकडीचा रस १ चमचा , कोबीचा रस १ चमचा हे सर्व मिक्स करून ”

चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग व वर्तुळे कमी होतात:-

१३. जांभूळाची बी पिंपल्सवर लावणे.

१४. चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात १ चमचा कच्चे दुध टाकून व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.

१५. चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे . चेहरा निखरतो .

१६. काकडी थंड, उत्साहवर्धक आणि तजेला देणारी आहे. कोबीमध्येही भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

१७. गाजराचा गर लेप म्हणूनही लावावा.

Leave a Comment

x