चित्ता आणि कोल्हा | Chitta aani Kolha Marathi Katha | Marathi Story

एकदा चित्त्याला असे वाटले की आपल्या कातडीवरील विचित्र व सुंदर ठिपके पाहिले असता, आपले सौन्दर्य सिंहापेक्षाही अधिक आहे, मग इतर प्राण्यांची काय कथा?मग तो चित्ता सगळ्या प्राण्यांचा तिरस्कार करू लागला, तेव्हा एक कोल्हा त्याला म्हणाला, ‘अरे, ही तुझी मोठी चूक आहे, कारण अंगातील सद्‌गुणांच्या भूषणावाचून बाहेरच्या भपक्याला शहाणे लोक भूषण म्हणत नाहीत.’

तात्पर्य

– जो सुंदर आहे, त्याने जर सौन्दर्याचा गर्व केला नाही तर ते अधिक शोभा देईल.

Leave a Comment

x