धागा जुळला जीव फुलला | Dhaga Julala Jeev Phulala Marathi Lyrics
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुमन कल्याणपूर
चित्रपट – धाकटी बहीण
Dhaga Julala Jeev Phulala Marathi Lyrics
धागा जुळला, जीव फुलला
वेड्या बहिणीला भाऊ मिळाला
ओढ लागे तुला कोटराची
भेट दोन्ही पिलापाखरांची
दैवलीला खरी, भाग्य आले घरी
अमृताने जणू देह न्हाला
माया ममतेची जुळतील नाती
राखी बांधीन रे आज हाती
उभी राहीन मी, वाट पाहीन मी
दृष्ट लागेल या सोहळ्याला
देवदूतापरी आज येई
रक्षणाला पुढेपाठी राही
स्वप्न साकारले, भाव झंकारले
मोल येईल या जीवनाला