धौम्य ऋषी सांगतसे | Dhoumya Rushi Sagatase Marathi Lyrics

धौम्य ऋषी सांगतसे | Dhoumya Rushi Sagatase Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – मधुबाला जव्हेरी
चित्रपट – सांगत्ये ऐका


धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा

रामा संगे जानकी नांदताना काननी
सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी
सीता म्हणे लाडकी, “मारा त्यासी राघवा
कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा”

राम गेले धावुनी ग बाणभाता घेऊनी
सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी
साद आला दूरचा कोणी मला वाचवा
ओळखिला साद तो बावरली सुंदरा
रामा मागे धाडिले लक्ष्मणा देवरा
काय झाले काय की ग ? चित्ती उठे कालवा

आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली
रावणाने पाऊले तोच पुढे टाकली
बैराग वेषाने मागे तिला जोगवा
डोळ्यांमधी आगळा भाव त्याच्या पेटला
जानकीचा धीर सारा हाती पायी गोठला
राक्षसाच्या हाती देह तिचा ओणवा

Leave a Comment