दिसते मजला सुखचित्र | Disate majala sukhchitra Marathi Lyrics

दिसते मजला सुखचित्र | Disate majala sukhchitra Marathi Lyrics

गीत – शान्‍ता शेळके
संगीत – अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल
चित्रपट – अष्टविनायक
राग – पहाडी

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते !
प्रीत तुझीमाझी फुलावी या फुलत्या वेलीपरी
भाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरी
शब्दांविना मनभावना अवघ्याच मी तुज सांगते !
हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे आस ही माझ्या उरी
तुजसंगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते !
स्वर्ग मिळे धरणीस जेथे रंग नवे गगनांगणी
सप्‍तसुरां लेवून यावी रागिणी अनुरागिणी
तुझियासवे सुखवैभवे सौभाग्य हे नित्‌ मागते !

Leave a Comment