डोळ्यांवरून माझ्या | Dolyawarun mazya Marathi Lyrics

डोळ्यांवरून माझ्या | Dolyawarun mazya Marathi Lyrics

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल

डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली विसरून रात्र गेली !
डोळ्यांत जन्म सारा दाटून डोह झाला
अश्रूंत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली !
मी मानिले मनाशी माझेच सर्व तारे
स्वप्‍नात हाय माझ्या बहरून रात्र गेली !

Leave a Comment