गळ्याची शपथ तुला | Galyachi Shapath Tula Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – माणिक वर्मा
Galyachi Shapath Tula Marathi Lyrics
गळ्याची शपथ तुला जिवलगा, तुला जिवलगा
मुखी सुधेचा कलश लाविला
एकहि नाही घोट घेतला
नकोस घेऊ असा हिसकुनी नकोस देऊ दगा
वेल प्रीतिची तूच लाविली
रुजली, फुटली, फुलू लागली
नको चुरगळू असा कठोरा तूच राखिली निगा
तहान हरली भूकहि हरली
एकच आशा मनात उरली
पुन्हा बोल ती नाजूक भाषा तूच जिवाचा सगा