!! आगमन बाप्पाचे !! गणपती बाप्पा मोरया | Ganpati Bappa Morya

संपूर्ण भारतात उत्साहात साजरा करणारा हा सण दहा दिवसांचा असतो आणि हा दिवस गणेश देवाचं जन्म दिवस मानाला जातो. परंतु शिवाजी महाराज ते बाळ गंगाधर टिळकापर्यंतचा ह्या सणाचा इतिहास वेगवेगळा आहे.

शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. सर्व प्रथम हा सण शिवाजी महाराजांच्या काळात ( १६३०-१६८०) स्थानिक संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिकरित्या साजरा केला जायचा. नंतर पेशव्यांच्या काळात पुणे हे गणेशोत्सवाचे केंद्रस्थान बनले. परंतु पेशवाई नंतर ह्या सणाचे महत्व कमी होत गेले. लोक फक्त आपापल्या घरातच हा सण साजरा करू लागल्यामुळे हळूहळू या सणाचे उत्सवाचे रूप गायब झाले.

त्यानंतर १८९३ साली लोकमान्य टिळकांनी “केसरी” या वर्तमान पत्रातून सार्वजनिक गणेशउत्सवाची संकल्पना लोकांसमोर मांडली, आणि या सणांद्वारे लोकांना इतरत्र आणून मिरवणुकीच्या निमित्ताने स्वातंत्र आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणजे नक्की काय हे दाखवून दिले. आणि तेंव्हापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला दहा दिवसांच्या गणेशउत्सवाची सुरुवात झाली व अनंत चतुर्थीला गणेश मुर्तीचे विसर्जन करायची प्रथा पडली.

या उत्सवाला महाराष्ट्रा प्रमाणेच कर्नाटक आणि तेलंगणा मधे विशेष महत्व दिले जाते. आज जगाच्या विविध भागात हा सण विशेष प्रकारे साजरा केला जातो. नेपाळमधील तराई भहग आणि इतर देश जसे अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, बर्मा, न्यूझिलंड, फिजी आणि टोबॅगो येथील हिंदू लोक हा उत्सव उत्सहात साजरा करतात.

या सणात चार महत्वाच्या क्रियापद्धती आहेत, पहिली प्राणप्रतिष्ठा : या विधीमधे पार्थिव मूर्तीचे आव्हाहन व स्थापना केले जाते. दुसरी षोडशोपचार: गणेश देवाचे सोळा प्रकारचे उपचार केले जातात. तिसरे उत्तरपूजा : मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिचे पूजन म्हणजेच उत्तरपूजा केली जाते. चौथे गणपती विसर्जन : शेवटच्या दिवशी गणेश मूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *