घर दोघांचे घरकुल पाखरांचे | Ghar Doghanche Gharkul Pakharanche Marathi Lyrics

घर दोघांचे घरकुल पाखरांचे | Ghar Doghanche Gharkul Pakharanche Marathi Lyrics

गीत – सुधीर मोघे
संगीत – सुधीर फडके
स्वर – अनुराधा पौडवाल
चित्रपट – चोराच्या मनात चांदणे


Ghar Doghanche Gharkul Pakharanche Marathi Lyrics

घर दोघांचे, घरकुल पाखरांचे

वाटा कशा निराळ्या जणु एकरूप झाल्या
एका खुळ्या जगात त्याही खुळावलेल्या
जुळले अतुट नाते दोन्ही मनामनांचे

कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही
पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही
रुजले कधी न बीज दोघांत संशयाचे

विश्वास ठेविला मी विश्वास तू दिलास
जपलेस तू मला अन्‌ मीही तुझ्या मनास
एका क्षणात अपुल्या सुख साधले युगांचे

Leave a Comment

x