हातीं नाही येणे | Haati Nahi Yene Marathi Lyrics

हातीं नाही येणे | Haati Nahi Yene Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – जावई विकत घेणे आहे


Haati Nahi Yene Marathi Lyrics

हाती नाही येणे, हाती नाही जाणे
हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे

पाण्यासंगे महाग झाला नवरा बाजारात
बाबा म्हणतो, “जा ग पोरी, पळुनी अंधारात”
या नवर्‍याचा लिलाव करती, ठरती तेच शहाणे

लाखांनी घर उजळून आले, झाले सारे दंग
लाखासाठी प्रीती म्हणते सोडा माझा संग
या लाखाची राख फासुनी सुटती लाख उखाणे

चैनीसाठी जगणे आता, चैनी जगण्यासाठी
बाई-बाटली-सट्टा-घोडा काही न उरले गाठी
किती करावे आनंदाचे फसवे रोज बहाणे

Leave a Comment

x