हाती नाही बळ | Haati Nahi Bal Marathi Lyrics

हाती नाही बळ | Haati Nahi Bal Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर -आशा भोसले
चित्रपट – चिमणी पाखरं


Haati Nahi Bal Marathi Lyrics

हाती नाही बळ, दारी नाही आड
त्याने फुलझाड लावू नये !

घालवेना चारा, होई ना जतन
त्याने तो गोधन पाळू नये !

सोसता सोसेना, संसाराचा ताप
त्याने मायबाप होऊ नये !

नामसंकीर्तना गवसेना वेळ
त्याने गळा माळ घालू नये !

Leave a Comment

x