हे कधी होईल का | He Kadhi Hoil Ka Marathi Lyrics

हे कधी होईल का | He Kadhi Hoil Ka Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – सुखाची सावली


हे कधी होईल का ?
करपलेल्या वल्लरीला पालवी येईल का ?

शिंपतो चैतन्य वारा
श्रावणाच्या धुंद धारा
वाळलेले अंग नवख्या अंकुरा लेईल का ?

गळून गेली सर्व पाने
मिसळले मातीत सोने
माणकांची देणगी ही मेदिनी देईल का ?

Leave a Comment

x