हे वदन तुझे की | He Vadan Tuze Ki Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – मालती पांडे ( बर्वे )
चित्रपट – सीता स्वयंवर
He Vadan Tuze Ki Marathi Lyrics
हे वदन तुझे की कमळ निळे ?
का नयन पाहता होति खुळे ?
विशाल झाले शांत सरोवर
नयनांपुढती अथांग सागर
शेषशायि तव रूप मनोहर-
हलकेहलके वर उजळे
कुठे सख्यांचा मेळा लपला ?
कोठे उपवन, कोठे मिथिला ?
श्रीविष्णू तू, मी तर कमला
शतजन्म चुरिन मी पदकमले