लाज राख नंदलाला | Laaj Rakh Nandlala Marathi Lyrics

लाज राख नंदलाला | Laaj Rakh Nandlala Marathi Lyrics

गीत – योगेश्वर अभ्यंकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – माणिक वर्मा


तव भगिनीचा धावा ऐकुनि धाव घेइ गोपाळा
लाज राख नंदलाला

द्युतामध्ये पांडव हरले
उपहसाने कौरव हसले
लाज सोडुनी सभेत धरीले माझ्या पदराला

अबलेसम हे पांडव सगळे
खाली माना घालुनि बसले
आणि रक्षाया शील सतीचे कुणी नाही उरला

आंसु माझिया नयनी थिजले
घाबरले मी, डोळे मिटले
रूप पहाया तुझे सावळे प्राण आता उरला

Leave a Comment

x