लांडगा आणि मेंढी | Landga aani Mendhi Marathi Katha
कुत्र्यांनी मारल्याने अर्धमेला झालेला एक लांडगा एका ओढ्याच्या काठी पडला होता. त्याला पाण्याची फार गरज होती. इतक्यात त्याला एक मेंढी दिसली. तो तिला म्हणाला, ‘ताई, मला थोडसं पाणी आणून दिलंस तर फार उपकार होतील. मला बाकी मांसबिस काही नको. फक्त पाणी हवं आहे.’
त्यावर ती मेंढी म्हणाली, ‘नको रे बाबा, आत्ता तुला मांस नको असेल, पण पाणी पिण्यापूर्वी तुला माझं मांस खावंसं वाटलं तर ? तो धोका मला पत्करायचा नाही. त्यामुळे तुझी विनंती मला मान्य करता येणार नाही.’
तात्पर्य
– दुसर्यावर उपकार करावा परंतु तो केल्याने आपल्यालाच अपाय होण्याचा संभव असेल तर उपकार न करणेच शहाणपणाचे होय !