माय यशोदा हलवी | Maay Yashoda Halavi | Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – कृष्णा कल्ले ,  सुधीर फडके
चित्रपट – संत गोरा कुंभार


माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
बालमुकुंदा मेघ:श्यामा करि गाई गाई

भरुनि येता हात जरा ती झोका थांबवुनी
उठे पाळण्यापाशी येई पाही डोकावुनी
हात पाय नाचवी श्रीहरि हासुनी वर पाही
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई

दिसमासाने कृष्ण वाढला लागे रांगाया
धरावयासी धावे माता वार्‍यासी वाया
पुरे पडे ना वाडा अंगण अपुरे त्या होई
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई

Leave a Comment

Exit mobile version