माणसा रे माणसा ठेव | Mansa Re Mansa Thev Marathi Lyrics

माणसा रे माणसा ठेव | Mansa Re Mansa Thev Marathi Lyrics

गीत – मा. दा. देवकाते
संगीत – राम कदम
स्वर – चंद्रशेखर गाडगीळ
चित्रपट – पदराच्या सावलीत


माणसा रे माणसा ठेव माणुसकीची लाज
कशासाठी माणुसकीला विसरलास आज
जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल

जिने तुला देली जन्मोजन्मी साथ
तिचा तरी हात सोडू नको
कुंकू लावियलं तुझ्या नावे भाळी
तिच्या हाती झोळी देऊ नको
जिने तुझ्या घरी पेटवली चूल
तिचे तरी हाल करू नको

आपुल्या हातानं खणुनिया खड्डा
आपुलाच मुडदा गाडू नको
आपुलेच प्रेत खांद्यावर घेत
वाजत गाजत जाऊ नको
साधू-संत म्हणती जगी वादळात
रहा बिनधास्त आनंदात

Leave a Comment