मज सुचले ग मंजुळ | Maz Suchale Ga Manjul Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – आशा भोसले
चित्रपट – पाहू किती रे वाट
मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे
हिंडता डोंगरापाठी सापडले कोरिव लेणे
बोलाविन घुमती वाद्ये, तालात नाचते प्रीती
शब्दाविन होती गीते, बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभूचे देणे
आकृति मनोहर इथल्या, मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे सर्वांग, तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले, जन्माचे झाले सोने