मी चंचल हो‍उन आले | Mee Chanchal Houn Aale Marathi Lyrics

मी चंचल हो‍उन आले | Mee Chanchal Houn Aale Marathi Lyrics

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – सुमन कल्याणपूर


मी चंचल हो‍उन आले
भरतीच्या लाटांपरी उधळित जीवन स्वैर निघाले

फुलवुनि गात्री इंद्रधनुष्ये
क्षितिज विंधुनी धुंद कटाक्षे
विरघळलेले नवथर उन्मद चंद्रकिरण मी प्याले

श्रावणाचिया अधरी लपुनी
रिमझिमणार्‍या धारांमधुनी
पानांवरचे पुसून आंसू उर्वशीच मी हसले

नजराणे घेऊन ऋतूंचे
हृदयातिल गंधित हेतूंचे
आकाशाची प्रिया कधी मी हो‍उनि लाजत सजले

जन्ममृत्युचे लंघुनि कुंपण
स्थलकालाच्या अतीत उमलुन
प्रवासिनी मी चिरकालाची अनाघ्रात ही उरले

Leave a Comment

x