मोहरला मधुमास | Moharla Madhumaas Marathi Lyrics

मोहरला मधुमास | Moharla Madhumaas Marathi Lyrics

गीत – पी. सावळाराम
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – आशा भोसले
चित्रपट – सून लाडकी या घरची


मोहरला मधुमास
मानसी, घडता नित्य तुझा सहवास

तव स्पर्शाने गुलमोहर तो
अंगाअंगातुन बहरून येतो
नयनांमधली निळी मोहिनी करिते नित्य विलास

नसता कोणी हिरव्या रानीं
गंधवतीला जवळ घेउनी
माझ्या भवती टाक मुलायम मृदुल करांचा पाश

Leave a Comment

x