आईची शिकवण

मी काय बोलू ह्यावर आईची ममता मी काय बोलू ह्यावर शब्दच फिके पडतील एकवेळ पेनातील शाई पण संपेल आईची महती मी काय बोलू ह्यावर आईवडिलांची मायाच ती काय माझ्याच जीवनाला रंगून जाते त्यांच्या प्रेमाची बात ती काय मी काय बोलू ह्यावर प्रत्येक कुटुंबासाठी आईची माया एक कवच बनून येते त्या अभेद्य कवचावरती मी काय बोलू ह्यावर माझी माय जशी दुधावरील साय तिची शिकवण तिचीच माया मी काय बोलू ह्यावर ती आहे चंदन स्वतःसाठी नाही पण आपल्या कुटुंबासाठी झिजते त्या चंदनावरती मी काय बोलू ह्यावर स्वतः भुकी राहून मला तिने स्वतः हाताने मायेने भरवले त्या प्रत्येक घासासाठी मी काय बोलू ह्यावर ती आहे देवी दुर्गा तीच अन्नपूर्णा माता पण तिच्या चरणी नतमस्तक मी काय बोलू ह्यावर……

Leave a Comment

Exit mobile version