मुंबईची लावणी | Mumbaichi Lavani Marathi Lyrics

मुंबईची लावणी | Mumbaichi Lavani Marathi Lyrics

गीत – शाहीर पठ्ठे बापूराव
संगीत – वसंत पवार
स्वर – छोटा गंधर्व
चित्रपट – पठ्ठे बापुराव


मुंबई ग नगरी बडी बांका.. जशी रावणाची दुसरी लंका.. वाजतो ग डंका
डंका चहूं मुल्की राहण्याला गुलाबाची फुल्की पाहिली मुंबई
मुंबई ग नगरी सदा तरनी व्यापार चाले मनभरुनी दर्याच्या गो वरुनी
वरुनी जहाजे फिरती आगबोटीत निराळी धरती पाहिली मुंबई
बोरीबंदर कोटकिल्ला टाटाच्या ग मैदानातला कमिटीचा बंगला देतो भेटीसरशी
ताजमहाल पॅलेस हाटेल तिथे तुला भेटेल त्याची इच्छभोजन मेजवानी मजेदारशी
सेक्रेटरी हॉल तुला काळाघोडा बहाल कुलाब्याच्या दांडीबागची हवा थंडगारशी
ट्रामगाड्या मोटारगाड्या हजार देतो खटारगाड्या व्हिक्टोरिया नव्या गाड्या रंगदारशी
लगबग भारी चाले गोंधळ सारा रस्त्यात मधे मोटारीची शिंग वाजे हितं गर्दी
परळापासून सरळ रस्ता भायखळ्याच्या पुलावरचा
तिथून पुढे खालचा लागंल उभा पारशी
जमशेदजी बाटलीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बिना वारशी
बटाट्याची चाळ तुला कायम सांभाळ तिथं बांधुनिया चाळ मग ताल धरशी
अगं हे दाजी हे.. अगं हे.. हो हो.. ईर.. जी जी जी जी जी
पवळे जपून चाल.. घाईघाईत होतिल हाल
धर हात सावरी तोल
हा पठ्ठे बापुचा बोल
अगं ही मुंबई.. पाहिली मुंबई..

Leave a Comment

x