ओठांवरती रोज प्रभाती | Othanvarti Aaj Prabhati Marathi Lyrics

ओठांवरती रोज प्रभाती | Othanvarti Aaj Prabhati Marathi Lyrics

गीत – मधुकर जोशी
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – निर्मला गोगटे


ओठांवरती रोज प्रभाती घ्यावे मंगल नाम
रघुपति राघव राजाराम

सुरेखसे ते संगमरवरी
पंचानन ते मम देव्हारी
हनुमंतासम हात जोडुनी पूजावा घनश्याम

पंचवटीच्या पाषाणातुन
नाम ऐकु ये श्रीरघुनंदन
गोदातीरी पर्णकुटीचे ज्याचे सुंदर धाम

भूलोकी या ऋषी वाल्मीकी
राम दर्शने होइ सार्थकी
परमार्थाचा मार्ग दाविती माझे प्रभु श्रीराम

Leave a Comment