पात्रापरी नदीच्या रस्ता | Paatrapari Nadichya Rasta Marathi Lyrics

पात्रापरी नदीच्या रस्ता | Paatrapari Nadichya Rasta Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले
चित्रपट – वरदक्षिणा


पात्रापरी नदीच्या रस्ता भरून वाहे
मी एक थांबलेली, जग चाललेच आहे

व्यवहार संपवूनी सारे घरा निघाले
कोणास भूक पोटी, कोणी मनीं भुकेले
कोणा हवा निवारा, कोणास प्रीत बाहे

कोणा तरुण जीवा अदृश्य ओढ लागे
वेगात तो निघाला नच पाहताच मागे
मनमोहिनी त्याची कोण्या घरात राहे

चाले धिम्या गतीने हाती धरून दीप
प्रीती प्रपंच सारे ज्याच्या दिठीत पाप
तो चालला फकीर घुमवीत शांत दोहे

Leave a Comment