प्रीतिच्या पूजेस जाता | Preetichya Poojes Jaata Marathi Lyrics

प्रीतिच्या पूजेस जाता | Preetichya Poojes Jaata Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – आशा भोसले
चित्रपट – जुनं ते सोनं


प्रीतिच्या पूजेस जाता मी अशी का थांबले ?
दाटते भीती उरी का, थबकती का पाऊले ?

दर्शनाची ओढ जीवा, दार उघडे स्वागता
अर्पणाचे तबक हाती, आडवी ये भीरुता
स्‍त्रीपणाच्या जाणिवेने शेवटी का गाठिले

चढुन जाता पायर्‍या या, मानिनी होते सती
देवता येथून गेल्या, पद्मजा वा पार्वती
पुण्यपंथी चालता या मीच का भांबावले

दूर हो लज्‍जे जराशी, मजसी आता जाऊ दे
साजरे सौभाग्य माझे मजसी पुरते पाहू दे
दोन जीवा जोडणारे, जोडवे हे वाजले

Leave a Comment