प्रिया तुज काय दिसे | Priya Tuj Kaay Dise Marathi Lyrics

प्रिया तुज काय दिसे | Priya Tuj Kaay Dise Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – आशा भोसले
चित्रपट – जिव्हा


प्रिया तुज काय दिसे स्वप्‍नात ?

आनंदाचे पाझर थटले मिटलेल्या नयनांत

मनासारखी मिळे सहचरी, फुलून दरवळे सुख संसारी
नकळे केव्हा येतीजाती दिवस आणखी रात

तुला न उरली तुझी आठवण, मी तर झाले तुला समर्पण
दुजेपणाचे नाव न उरले दोघांच्या जगतात

मोहरलेल्या या ऐक्यावर, एक होतसे नवखी थरथर
दिसल्यावाचून जाणवते मज नवल आतल्या आत

Leave a Comment

x