रात आज धुंदली | Raat Aaj Dhundali Marathi Lyrics

रात आज धुंदली | Raat Aaj Dhundali Marathi Lyrics

गीत – मधुसूदन कालेलकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – लग्‍नाला जातो मी


रात आज धुंदली, प्रीत आज रंगली
मन वेडे गुंतले आज तुझ्या कुंतली

चंद्रवदनी झाकसी मेघ तरल सावळे
लाल अधर मखमली अमृतात नाहले
गंध नाचरी उभी तरल ही चाफेकळी

टिपुन तूच घेतले चांदणे नभांतले
रातराणी आज ही बहरली तुझ्यामुळे
चांदणी झुरे मनी मुग्ध पाहुनी खळी
प्रीत आज रंगली

लाजरे गुलाब दोन गालांवर लाजले
रंग-कुंचल्याविना चित्र कसे साधले
अमूर्त काय कल्पना मूर्त आज या स्थली
प्रीत आज रंगली !

Leave a Comment