राम भजन कर लेना | Ram Bhajan Kar Lena Marathi Lyrics

राम भजन कर लेना | Ram Bhajan Kar Lena Marathi Lyrics

गीत – डॉ. वसंत अवसरे
संगीत – वसंत पवार
स्वर – पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट – अवघाचि संसार


राम भजन कर लेना
एक दिन जाना, रे भाई !

दोन दिसांची ही तर दुनिया
ही पैशाची सारी किमया
धनदौलत ही केवळ माया
अंती येता हाक दूरची
जिथल्या तेथे राही
एक दिन जाना, रे भाई !

बाप कोठला ? अन्‌ कुठली आई ?
कुठले भाऊ ? अन्‌ कुठल्या ताई ?
अखेर अपुले कोणी नाही
तुटे पिंजरा, सुटे पाखरू
दूर भरारी घेई
एक दिन जाना, रे भाई !

पाया पडता लाथ मारिती
लाथ मारिता गुलाम होती
हीच जगाची उलटी रीती
आशा जगाची कशास भीती ?
पडू नको या मोही
एक दिन जाना, रे भाई !

Leave a Comment

x