सखी ग मुरली मोहन | Sakhi Ga Murali Mohan Marathi Lyrics
गीत – पी. सावळाराम
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर -आशा भोसले
चित्रपट – धर्मकन्या
सखी ग, मुरली मोहन मोही मना
गाऊ किती पुन्हापुन्हा, त्याच्या गुणा
शृंगाराची प्रीत करिता चिंतन
अनुराग त्याचा देता आलिंगन
चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा
कानीं येता ज्याच्या बासुरीचे सूर
कालिंदीला येता आनंदाचा पूर
गोपिकांच्या घरी प्रीतिचा पाहुणा