सांग तू माझाच ना | Sang Tu Mazach Na Marathi Lyrics

सांग तू माझाच ना | Sang Tu Mazach Na Marathi Lyrics

गीत – सुधीर मोघे
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – धाकटी सून


Sang Tu Mazach Na Marathi Lyrics

सांग तू माझाच ना ?
राहू कशी तुझियाविना

चालता वाटेवरी हे कोवळे सुख भेटले
प्रीतीच्या वळणावरी मी थांबले.. गुंतले
भासते उतरून खाली स्वर्ग ये जणु पाहुणा

भेट होता एक; झाले- मी नवी, जगही नवे
वाटते आले जुळूनी जन्मजन्मीचे दुवे
जीवना लाभे किनारा, स्वप्‍न लाभे लोचना

हात हाती गुंफिलेले ना कधी सोडायचे
एक नाते जोडिले ते ना कधी तोडायचे
दूर नाही जायचे स्वप्‍नातही, मनमोहना

Leave a Comment

x