शोधू नको मना रे | Shodhu Nako Mana Re Marathi Lyrics

शोधू नको मना रे | Shodhu Nako Mana Re Marathi Lyrics

गीत – वंदना विटणकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – अपर्णा मयेकर


Shodhu Nako Mana Re Lyrics

शोधू नको मना रे तू अर्थ जीवनाचा
अज्ञात खेळ चाले हा ऊन-सावल्यांचा

असते इथे निराशा आशेत गुंफलेली
स्वप्‍ने सजून येती वैफल्य माळलेली
हास्यांत साठलासे उद्‍घोष आसवांचा

बहरांतल्या कळीला निर्माल्य शाप देते
बाधा तशी जरेची का यौवनास होते ?
उदयासवेच ठरतो आकार शेवटाचा

Leave a Comment

x