टाळ बोले चिपळीला | Taal Bole Chipalila Marathi Lyrics

टाळ बोले चिपळीला | Taal Bole Chipalila Marathi Lyrics

Taal Bole Chipalila Marathi Lyrics sung by Pt. Bhimsen Joshi, Pt. Vasantrao Deshpande, lyrics written by Jagdish Khebudkar, music composed by Ram Kadam. This Song is from Marathi Movie Bholi Bhabdi.

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – पं. भीमसेन जोशी ,  पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट – भोळी भाबडी


Taal Bole Chipalila Marathi Lyrics

टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाउ नाचु सारे हो‍उनी निःसंग

जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग

ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई
एकएक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Taal Bole Chipalila Marathi Lyrics या गाण्याचे बोल समजले असतील. टाळ बोले चिपळीला गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.

Leave a Comment