तांडा चालला रे गड्या | Taanda Chalala Re Gadya Marathi Lyrics

तांडा चालला रे गड्या | Taanda Chalala Re Gadya Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – अरुण सरनाईक ,  कृष्णा कल्ले
चित्रपट – डोंगरची मैना


Taanda Chalala Re Gadya Marathi Lyrics

तांडा चालला रे गड्या तांडा चालला
आज हितं उद्या तिथं खेळ नवा मांडला
तांडा चालला रे गड्या तांडा चालला

एक गाव सोडुनी दुसरं गाव जोडू या
मुशाफिरी वसती ही घडोघडी मोडू या
संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला

वनवासी जिणं हे जल्माला लागलं
दु:खाचं काटंकुटं ठाईठाई पेरलं
कधी सरंल वाट ही ठावं नाही कुणाला

हिरवळीचा बिछाना धुक्याची रे वाकळ
रात कधी संपली कधी झाली सकाळ
माकडीच्या माळाला झेंडा आज रोविला

Leave a Comment

x