जेष्ठांसाठी टाऊनशिप

एक अशी टाऊनशिप जेष्ठांसाठी जी जेष्ठ लोकांची खरी ओळख ठरू शकेल. ही टाऊनशिप जवळ जवळ १०० एकर जमिनीवर उभी
करणे गरजेचे. ज्या टाऊनशिपमध्ये १,२,३ बेडरूम्सची खास डिझाईन केलेली अपार्टमेंट्स असतील. ज्याची किंमत सामान्य
लोकांना परवडणारी असतील. ह्या टाऊनशिपमध्ये सिनिअर सिटीझन लोकांसाठी खास ३ बेडरूम्सचे व्हिलाज असतील.
त्याच्या किमती पण कमी असतील.

ह्या टाऊनशिप मधल्या अमेनिटीज

१) जेष्ठांसाठी खास उद्यान असेल त्या उद्यानामध्ये वाचनालय , जॉगिंग ट्रॅक , सायकल ट्रॅक व जेष्ठांसाठी जिम ची सोय असेल
२) जेष्ठांसाठी खास विरंगुळा केंद्र असेल
३) जेष्ठ लोकांसाठी खास उद्योग विकास केंद्र असेल
४) ह्या टाऊनशिपमध्ये कॅमेरे असतील ह्या कॅमेरांचा ऍक्सेस पॉईंट प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असेल
५) ह्या टाऊनशिपमध्ये एक स्वतंत्र पोलीस स्टेशन सुद्धा असेल
ही टाऊनशिप प्रत्येक शहराच्या जवळ असेल.
ही टाऊनशिप वृध्दाश्रमाला पर्याय ठरू शकतो. ह्या टाऊनशिपमुळे जेष्ठ नागरिक हे सेफ राहतील.

Leave a Comment