उघडी द्वार पूर्वदिशा | Ughadi Dwaar Poorvadisha Marathi Lyrics

उघडी द्वार पूर्वदिशा | Ughadi Dwaar Poorvadisha Marathi Lyrics

गीत – पी. सावळाराम
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – आशा भोसले ,  पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट – लक्ष्मी आली घरा


उघडी द्वार पूर्वदिशा नारायण आले,
उजाडले !

भूमिपाल चालला धरतीच्या पूजना
शिंपडी सडा सजवी सुवासिनी अंगणा
वसुंधरेचे हास्य झळकले,
उजाडले !

गंगेवर तेजाचा पाऊस झिमझिमता
पर्णावर मोत्यांचे दंवबिंदु लखलखता
गंधवतीने रंग उधळिले,
उजाडले !

पूजीत कुलदेवा महेशा
येई फुलवीत मनीची आशा
सुखवी घरदार घेऊनी त्या
जीव जिवाचा जगवीता

Leave a Comment