वेडी खुळी ही प्रीत मला | Vedi khuli Hi Preet Mala Marathi Lyrics

वेडी खुळी ही प्रीत मला | Vedi khuli Hi Preet Mala Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – आशा भोसले
चित्रपट – चव्हाटा


Vedi khuli Hi Preet Mala Marathi Lyrics

वेडी खुळी ही प्रीत मला कोडं घालते
अबोल मी झाले तरी लाज बोलते

माझ्यावानी अल्लड नव्हती ही
गाणं भुंग्याचं कमळाभवती
वार्‍यासंगं कळी कशी रंग खेळते
लाज बोलते.. कोडं घालते

वेल झाडाला बिलगून बसली
पायवाटेची हिरवळ हसली
माझ्यात मी दंग अशी धुंद डोलते
लाज बोलते.. कोडं घालते

ओढ भेटीची मनात राहिना
कसं सांगू मी ओठात येईना
सपनं हे माझं त्याला मीच भाळते
लाज बोलते.. कोडं घालते

Leave a Comment

x