एका खेडे गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता ज्याने आयुष्यात हार मानली होती. तो आयुष्यात जे काही करायचा त्याचा पराभव त्याला पहिला पासूनच दिसायचा. शाळेतील शिक्षक व इतर विद्यार्थी त्याची थट्टा करत असत . तो बऱ्याचदा अंधाऱ्या खोलीत रडत राहाचा. एके दिवशी एक आंधळा माणूस त्याचा रडायचा आवाज ऐकून त्याच्या जवळ आला आणि त्याला विचारू लागला कि तू का रडत आहेस. मग राहुलने त्या माणसाला सर्व काही सांगितले. हे सर्व ऐकून तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला, तुला माहित आहे का जेव्हा मी जन्मलो आणि लोकांनी पाहिले की या मुलाला डोळे नाहीत, तेव्हा त्यानी माझ्या पालकांना मला ठार मारण्याचा सल्ला दिला. त्यांनी माझ्या पालकांना सांगितले की तो आंधळा आहे. ह्यचा आयुष्यभर त्रास होईल, त्यापेक्षा ह्यला ठार मारला तर चांगला होईल. पण माझ्या पालकांनी त्यांचा सल्ला नाही ऐकला, त्यानी मला एका खास शाळेत पाठवले आणि मला शिकवले. जेव्हा मी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेलो होतो, तेव्हा कॉलेज प्रशासनाने मला प्रवेश देण्यास नकार दिला मग मी परदेशी विद्यापीठाचा फॉर्म भरला आणि एमआयटीच्या शिष्यवृत्तीवर पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली. मग मला कळले की आंधळेपणामुळे मला नोकरी साठी कोणी घेणार नाही. मग मी माझी कंपनी सुरू केली परंतु माझ्याकडे खूप पैसे नव्हते, पण कसे बसे पैसे जमवून कंपनी सुरु केली आणि आज माझ्या कंपनीच्या माध्यमातून माझ्यासारख्या 5000 लोकांना नोकरी देण्यात सक्षम झालो आहे.
त्या माणसाचे बोलणे ऐकल्यानंतर राहुलने विचारले, तुमच्या कहाणीशी माझे काय संबंध आहे?
तो माणूस म्हणाला, ज्याप्रमाणे आज लोक तुमच्यावर हसतात, त्याच प्रकारे लोकांनी आयुष्यभरासाठी मला दोषी ठरवले, त्याचप्रमाणे त्यांनी माझी चेष्टा केली. पण मी कधीही स्वत: ला अशक्त मानले नाही.
जेव्हा जग माझ्याकडे कमी डोळ्यांनी पहायचे आणि म्हणायचे की हा आयुष्यात काहीही करु शकत नाही. तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचो कि मी काहीपण करू शकतो. जस मी खूप काही केल, तस तुही करु शकतो. तर हार मानू नको. जग काय म्हणतो याची काळजी करू नको
तात्पर्य: जग आपल्याला कसे पाहते हे महत्वाचे नाही, तर आपण जगाकडे कसे पाहतो तेमहत्वाचे आहे.