Connect with us

तंत्रज्ञान

उबंटू काय आहे आणि याचा वापर कुठे होतो? What is Ubuntu Linux in Marathi

Published

on

उबंटू ही एक लिनक्स डिस्त्रीबुशन(Linux Distributions) सिस्टीम आहे, जे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम(Operating System) ला चालवायला मदत करते.

ऑपरेटिंग सिस्टीम(Operating System) म्हणजे काय?

ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ज्याच्या मदतीने संगणकाला दिशा दाखवण्यासाठी लिहिला गेलेला एक प्रोग्रॅम(Program) आहे. जसे कि आपण मायक्रोसॉफ्ट विंडोज(Microsoft Window) ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो. या विंडोज मध्ये सुद्धा काही प्रकार आहेत जसे कि विंडोज ७, विंडोज १०. आपल्या गरजेनुसार आपण हि ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या मशीन मध्ये लोड करतो. 

जसे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम आहेत तसेच लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम चे पण काही प्रकार आहेत जसे कि उबंटू, फिल्मोरा. फरक फक्त एवढाच कि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम या इंटरनेटवर फ्री मध्ये उपलब्ध आहेत. तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम चा वापर करण्यासाठी आपल्याला मिक्रोसाफ्ट या कंपनीला पैसे द्यावे लागतात. 

उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम समजायला थोडी मुश्किल असते आणि खासकरून हि ऑपरेटिंग सिस्टीम प्रोग्रॅमर्स वापरतात. जरतुम्ही संगणकाचा वापर केवळ मिक्रोसाफ्ट ऑफिस किव्हा चित्रपट बघण्यासाठी करणार असाल तर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम चा वापर करा. भले ते फ्री नसेल पण जर तुम्ही घरी त्याचा वापर करणार असाल तर तुम्हाला कोणताही हार्डवेअर दुरुस्ती करणारा व्यक्ती ३००-५०० रुपयांमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या मशीन मध्ये लोड करून देऊ शकतो.  

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *